पुणे, गुजरात संघाना सध्या तरी मुदतवाढ नाही : राजीव शुक्ला
नवी दिल्ली, दि. 09 - ‘आयपीएल’मधील पुणे आणि गुजरात संघाचा करार हा दोन वर्षांपूरताच होता. त्यामुळे या दोन संघांना वाढीव कालावधी देण्याचा सध्या तरी व्यवस्थापनाचा विचार नाही, असे इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)चे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चेन्नई आणि राजस्थान या संघांना दोन वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर त्या जागी तितक्याच कालावधीसाठी पुणे आणि गुजरात संघांना करारबद्ध करण्यात आले होते. पुढील हंगामापासून आता चेन्नई आणि राजस्थान संघ स्पर्धेत खेळतील. अशा परिस्थितीत 10 संघांची स्पर्धा खेळवण्याचा सध्या तरी व्यवस्थापनाचा विचार नाही, त्यामुळे पुणे आणि गुजरात संघांना मुदतवाढ देण्याचा विचार नाही, असे शुक्ला यांनी सांगितले. जर 10 संघांची स्पर्धा खेळवण्याचा विचार झालाच, तर पुणे आणि गुजरात संघांना नव्याने निविदा प्रक्रियेला सामोरे जावे लागेल, असेही शुक्ला यांनी नमूद केले.