ख्रिस लीन सर्वात तडाखेबाज फलंदाज : गौतम गंभीर
कोलकाता, दि. 09 - कोलकाता संघाचा सलामीवीर ख्रिस लीन हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात तडाखेबाज फलंदाज आहे, असे मत संघाचा कर्णधार गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.
लीन हा आताच्या क्षणाला सर्वात तडाखेबाज आणि स्फोटक फलंदाज आहे. दुखापतीमुळे महिनाभर क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतरही ज्या पद्धतीने त्याने पुनरागमन केले, ती बाब उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. त्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे. म्हणूनच त्याने जोरदार फलंदाजी केली. पुनरागमन केल्यानंतर त्याने केलेला खेळ तो मानसिकदुष्ट्या किती सक्षम आहे, हे दाखवतो, असेही गंभीर म्हणाला.