Breaking News

नागालँडमधील बॅडमिंटनपटूंना मार्गदर्शन करण्याची इच्छा : अश्‍विनी पोनप्पा

दिमापूर, दि. 09 - भारताची बॅडमिंटनपटू अश्‍विनी पोनप्पा हिने ईशान्य भारत आणि विशेषत: नागालँड राज्यातील नवोदित बॅडमिंटनपटूंना मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पहिल्या ईशान्य मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी ती बोलत होती.
बॅडमिंटन हा सुंदर खेळ आहे. ईशान्य भारतातील नव्याने उदयाला येणा-या बॅडमिंटनपटूंमध्ये प्रतिभा आहे. या स्पर्धेच्या माध्यामातून त्यांना उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करू शकतील, असेही अश्‍विनी म्हणाली. ईशान्य भारत आणि विशेषत: नागालँडमधील बॅडमिंटनपटूंना मार्गदर्शन करायला मला नक्की आवडेल. त्यांना मार्गदर्शन करण्याची माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी पुन्हा या भागात येईन, असेही अश्‍विनीने सांगितले.