छत्तीसगडमध्ये नक्षलवादी, सुरक्षा दलांमध्ये चकमक; नक्षलवादी पसार
रायपूर, दि. 12 -छत्तीसगडमधील कांकेर या नक्षलग्रस्त जिल्ह्यात बांदे येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. मात्र सुरक्षा दलांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे नक्षलवाद्यांनी या भागातून काढता पाय घेतला. या चकमकीत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
बांदे पोलीस हद्दीत सुरू असलेल्या रस्ते निर्मितीला संरक्षण देण्यासाठी सुरक्षा दलाचे एक पथक गस्तीवर पाठवण्यात आले होते. सुरक्षा दल गस्तीवर असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. मात्र सुरक्षा दलाने दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर नक्षलवादी या भागातून पसार झाले, अशी माहिती एका अधिकार्याकडून देण्यात आली. या भागातील शोधमोहिम आणखी तीव्र करण्यात आली आहे.