पाटणा येथे 30 लाख रूपयांच्या जुन्या नोटा जप्त
पाटणा, दि. 12 - पाटणा येथील अगमकुआं भागातील बांधकाम व्यवसायिकाच्या घरावर छापा टाकत पोलिसांनी 30 लाख रूपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या. या प्रकरणी बांधकाम व्यवसायिक विनोद विश्वास याला अटक करण्यात आली. विश्वाससह त्याच्या अन्य चार सहकार्याला अटक करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा अचानक रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यानंतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आली होती.
या पूर्वीही 24 एप्रिल रोजी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील धरमपूर भागातून पोलिसांनी एका घरावर छापा टाकत 30 लाख रूपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या होत्या.