पंतप्रधान मोदी यांच्या दौ-यापूर्वी श्रीलंकेतील मंदिरात मधमाश्यांचा हल्ला; 50 भाविक जखमी
कोलंबो, दि. 12 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौ-यापूर्वी कोलंबोमधील मुंडल येथील मंदिरात मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 50 भाविक जखमी झाले आहेत. यात एका बौद्ध भिक्खु चाही समावेश आहे. भगवान बुद्धांच्या जन्मदिवसानिमित्त अनेक भाविक या मंदिरात एकत्र जमले होते.
श्रीलंकेत हा दिवस पवित्र मानला जात असून उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. त्यामुळे यासाठी परदेशातून अनेक जण याठिकाणी उपस्थित राहतात. पंतप्रधान मोदी आजपासून दोन दिवस श्रीलंका दौ-यावर आहेत. दोन देशांमधील द्विपक्षीय संबंध दृढ व्हावेत यासाठी हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. हा पंतप्रधान मोदी यांचा श्रीलंकेचा दुसरा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे.