Breaking News

जी. पी. असोसिएशनला सहकार्य करणार : श्‍वेता सिंघल

सातारा, दि. 26 - जी. पी. कॉन 2017 या वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा डी. सी. सी. बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. कार्यशाळेचे उद्घाटन  करताना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सातारा सारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यशाळा घेवून वैद्यकीय व्यवसायिकांपर्यंत सर्व अपडेट पोहचविण्याचे जे  काम असोसिएशन करत आहे. त्याबद्दल कौतुक करुन जी. पी. असोसिएशनने असेच नवनवीन कार्यक्रम घ्यावेत. नवनवीन संकल्पना मांडाव्यात. कि जेणे करुन  समाजाचे आरोग्य सुस्थितीत राहील. त्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिले. 
उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अस्तित्व परिषदेचे मिलींद कुलकर्णी यांनी जनरल प्रॅक्टीशनर्सना प्रशासनात सामावून घ्या. त्यांना वेगळी वागणूक देवू नका. सरकारी  रुग्णालयात कमतरता असताना अशा रजिस्टर्ड प्रॅक्टीशनर्सना विविध ठिकाणी संधी देवून आरोग्य व्यवस्था सुलभ कशी होईल इकडे लक्ष्य द्यावे असे सांगितले. सकाळ  सत्राच्या प्रास्ताविकात जी. पी. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयदिप चव्हाण यांनी जी. पी. कॉन 2017 च्या या वर्षात अवयवदानाचे 10 हजार फॉर्म भरणार असून  जी. पी. असोसिएशनचे स्वत:चे कार्यालय असावे यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच डॉक्टरांच्या सर्व अडी अडचणींना महोरात्र मदत करणार असल्याचे सांगितले.  उद्घाटनाच्या कार्यक्रमात असो. च्यावतीने ऑलोपॅथी, आयुर्वेद व होमीओपॅथी तीनही धन्वंतरीचा सत्कार करण्यात आला. यामध्ये ऑलोपॅथीचे डॉ. शरद मेहंदळे,  आयुर्वेदाचे डॉ. मोहन तांबे, होमिओपॅथीचे डॉ. दत्तात्रय बारटक्के यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. अरविंद काळे व डॉ. संजय यादव यांनी धन्वंतरीचा परिचय  करुन दिला.
डॉ. मनीष इनामदार व डॉ. वृदा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. जी. पी. असो. चे सेक्रेटरी डॉ. अविनाश वरंडे यांनी आभार मानले. कार्यशाळा संपन्न होण्यासाठी  डॉ. रवी भोसले, डॉ. दाउद मोमीन, डॉ. नितीन लेंभे, डॉ. राजेंद्र सकुंडे, डॉ. तुषार पिसाळ, डॉ. प्रसन्न बाबर, डॉ. अभय चव्हाण, डॉ. वृंदा कुलकर्णी, डॉ.विनायक  जोग, डॉ. सुरेश शेलार, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. विश्‍वजीत बाबर, डॉ. सुधीर चव्हाण, डॉ. अरविंद गावडे, डॉ. रविराज निकम, डॉ. अभिजीत गुरव यांच्यासह अनेक  डॉक्टरांंनी परिश्रम घेतले.