वाठारजवळ पुलावरून वाहने कोसळण्याचा धोका
सातारा, दि. 26 - रहिमतपूर ते वाठार (किरोली) रस्त्यादरम्यान वाठारजवळ पूल असून, हा अरुंद व त्याला संरक्षक कठडे नसल्याने या पुलावर आजवर छोटे- मोठे अनेक अपघात झाले आहेत. मात्र, पुलाचे रुंदीकरण, संरक्षक कठडे बांधण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. गंभीर अपघात झाल्यावर या विभागाला जाग येणार काय असा सवाल विचारला जात आहे.
वाठार (किरोली) रस्त्यादरम्यान वाठारजवळ एका सार्वजनिक सिंचन योजनेचे पंपिंग हाऊस आहे. परिणामी तेथे कायम मोठा पाणीसाठा केला जातो. त्याचे बॅकवॉटर रस्त्यापर्यंत येते. रस्त्यावर असलेल्या पुलाखालूनही पाणी वाहत असते. तेथे पाण्याची खोली साधारण 50 ते 100 फूट खोल असू शकते, असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, या पुलाला कसलेही संरक्षक कठडे नाहीत. पूर्वी कधी तरी बांधलेले छोटे संरक्षक कठडे कुठेतरी वितभर तोंड वर काढलेले दिसतात. त्यातच हा पूलही खूप अरुंद आहे. पुलाचा पायाही कमकुवत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अशा स्थितीमध्ये या पुलावरून वारंवार छोटे- मोठे अपघात होत असतात. मात्र, त्याच्या नूतनीकरणाकडे किंवा दुरुस्तीकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. वाठार (किरोली) रस्त्यावरून रहिमतपूरकडून कर्हाडकडे जाणारी एसटी, खासगी मालवाहतूक, हंगामनिहाय उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. दुचाकी वाहनांचीही वर्दळही कायम असते. पुलाजवळ आल्यावर पुलाच्या दोन्ही बाजूला पाण्याच्या बाजूने खोल उतार आहे. प्रत्यक्ष पुलावर व दोन्ही बाजूला कसलेच संरक्षक कठडे नाहीत. पुलाचा पाया भक्कम करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.