शिष्यवृत्ती घोटाळ्याचा तपास ‘एसडीपीओ’कडे!
बुलडाणा, दि. 29 - केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर विविध शिष्यवृत्ती, तसेच शैक्षणिक शुल्क घोटाळया प्रकरणी धाड पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास आता उपविभागीयपोलीस अधिकारी बी.बी.महामुनी यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, आणखी काही विद्यालयांमध्येही असाच प्रकार झाला का? याबाबत देखील तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे.
बुलडाणा शहरात असलेल्या राधेय कॉलेज ऑफ टेक्नीकल एज्युकेशन अँड एचएमसीटी, या संस्थेने किरण सदाशिव मोरे (ढालसावंगी ता.बुलडाणा) विद्यार्थ्याचे शैक्षणिक कागदपत्रे मिळविले. त्याचा आपल्या संस्थेत प्रवेश दाखविला. नव्हे तर त्याच्या नावाची 2 हजार 300 रुपयांची शिष्यवृत्ती व 20 हजार रुपयांचे अनुदान लाटले. ही बाब विद्यार्थ्याच्या लक्षात आल्याने त्याने 24 मे रोजी धाड पोलिसांत संस्थेच्या विरोधात फसवणूकीची तक्रार दिली होती. या प्रकरणी ठाणेदार संग्राम पाटील यांनी संस्थेचे प्राचार्य व पदाधिकार्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला होता. दरम्यान पोलीस अधीक्षक शशी कुमार मीना यांच्या आदेशान्वये सदर तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब महामुनी यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.