ऑम्लेट सेंटरमध्ये देशी दारुचे 14 बॉक्स!
बुलडाणा, दि. 29 - सिंदखेड राजा येथील एका ऑम्लेट सेंटरमध्ये देशी दारुचे 14 बॉक्स मिळून आले. या प्रकरणात एका आरोपीस अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने 26 मे रोजी ही कारवाई केली. त्यामुळे दारुविक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक शशी कुमार मीना यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचे सुत्रे हाती घेताच बेकायदा व्यवसायांना प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाने जिल्हाभरात छापेमारी सुरु केली. नव्हे अनेक दारुविक्रेत्यांसह जुगार्यांना जेरबंद करण्याची मोहिम अविरत सुरु आहे. दरम्यान गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना शुक्रवार 26 मे रोजी सिंदखेड राजा येथील सिंदखेड राजा-जालना रोडवर असलेल्या आदित्य ऑम्लेट सेंटरमध्ये अवैधरित्या देशी दारुचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शिकारे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर, नाईक पोलीस शिपाई विजय दराडे, गजानन आहेर, विलास साखरे, अविनाश जाधव, गजानन जाधव यांनी धाड टाकली. यावेळी उपरोक्त ठिकाणी 47 हजार 40 रुपये किमतीचे देशी दारुचे 14 बॉक्स मिळून आले. या प्रकरणात आरोपी अमोल खराडे याच्या विरोधात मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येवून आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सिंदखेड राजा पोलीस करीत आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने सुरु असलेल्या धाडसत्रामुळे बेकायदा व्यवसाय धारकांचे चांगलेच धाबे दनानले आहे. अर्थातच जिल्ह्यातील अवैध दारु विक्रीला मोठ्या प्रमाणावर आळा बसला, हेच अशा कारवायांमधून दिसून येत आहे.