Breaking News

ग्रामपंचायतींना दिले 3.15 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट!

बुलडाणा, दि. 29 - राज्य शासनाने सन 2019 पर्यंत 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, यावर्षी जिल्ह्यातील 859 ग्रामपंचायतींना 3 लाख 15 हजाराचे उद्दिष्ट दिले आहे.
बुलडाणा जिल्ह्याला यंदा 8.52 लक्ष वृक्ष लागवड करावी  लागणार आहे. या मध्ये सर्वाधिक उद्दिष्ट जिल्हयातील 859 ग्राम पंचायतींना 3.15 लाख इतके देण्यात आले आहे. तर वनीकरण सामाजिक वनीकरणचा यामध्ये मोठया प्रमाणात सहभाग  राहणार आहे. जिल्ह्यात होणार्‍या वृक्षलागवडीमध्ये वन विभाग दोन लाख 28 हजार, सामाजिक वनीकरण एक लाख 28 हजार, कृषी विभाग 68,512, नगर विकास विभाग 17 हजार, सार्वजनिक बांधकाम विभाग 2 हजार, सहकार तथा वस्रोद्योग विभाग 10 हजार, प्राथमिक शिक्षण विभाग 32,830, माध्यमिक शिक्षण विभाग 10 हजार 59, गृह विभाग 5 हजार 500, आदिवासी शाळा 6 हजार 750, सामाजिक न्याय विभाग 1 हजार 445, जिल्हा आरोग्य अधिकारी बावन प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फंत 1 हजार 404, जिल्हा शल्य चिकीत्सक 16 संस्थाद्वारा 1 हजार 300, महावितरण 2 हजार 700, अन्न औषधीप्रशासन 103 दवाखांन्याद्वारा 165, राज्य उत्पादन शुल्क विभाग 800, कारागृह विभाग 200, राज्य परिवहन विभाग 700, उप प्रादेशिक परिवहन विभाग 50, विधी न्याय विभाग 159, जि.प. सिंचन विभाग 1 हजार 600, पाटबंधारे 11,700, कौशल्य विकास विभाग 13 औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामार्फंत 2 हजार, महसुल विभाग 2 हजार 900, बाल कल्याण विभाग दोन हजार 860, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग 122 दवाखान्यामार्फत 2 हजार 420, जिल्हा आयुक्त पशुसंवर्धन 5 दवाखान्यांमार्फत 260, जिल्हा कोषागार कार्यालय 50, बीएसएनएल 50, जिल्हा डाक कार्यालय 200, क्रीडा विभाग 100 ग्राम विकास विभाग 3 लाख 15 हजार वृक्षाचे रोपण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.