पनवेलमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपवर चौफेर टीका
पनवेल, दि. 22 - रिकाम्या खुर्च्यांशी संवाद साधूनही मुख्यमंत्र्यांनी सत्ता स्थापन केली, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपवर निशाणा साधला. पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पनवलेमध्ये आज शिवसेनेचे सभा होती. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
प्रबोधनकार घडले याच पनवलेमध्ये. आमचं घराणंही पनवलेचंच, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवाय, पनवेल महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कोणाच्या मेहेरबानीवर जागा नको, तुमच्या आशीर्वादानं हव्या आहेत. जनतेसमोर पदर पसरेन, पण भाजपसमोर पसरणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. शिवाय, भाजपने भ्रष्टाचार्याला पक्षात घेऊन वाल्याचा वाल्मिकी केला, अशी टीकाही त्यांनी केली. निवडणुकीच्या सभांना मुख्यमंत्र्यांनी जाऊ नये, अशी निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.