Breaking News

तुम्ही सत्ता द्या, आम्ही विकास देऊ, मुख्यमंत्र्यांचं पनवेलकरांना आवाहन

पनवेल, दि. 22 - नगरपालिका, जिल्हा परिषदा, महानगरपालिकांमध्ये भाजप बहुमताने जिंकली आहे. त्यामुळे परिवर्तन करणारी भाजप आहे. पनवेलकरांनीही महापालिका हाती द्यावी, आम्ही विकास देऊ, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलकरांना केले. पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी पनवेलकरांवर घोषणांचा पाऊस पाडला.
पनवेल महापालिका होऊ नये म्हणून विरोधकांनी अनेक प्रयत्न केले. कोर्टात केसही दाखल केल्या. मात्र, भाजप सरकारने पनवेल शहराचा विकास करण्यासाठी महापालिका स्थापन केली., असे मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना सांगितले.