झेंडीगेट अशरफी मस्जिद येथे रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ
अहमदनगर, दि. 26 - प्रभाग क्र.19 झेंडीगेट येथील अशरफी मस्जिद ते कमाटीपुरा परिसरात नगरसेवक हाजी नजीर अहमद उर्फ नज्जू पैलवान यांच्या विकास निधीतून रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक गणी कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दरबार फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी वाजीद जहागीरदार, एजाज शेख, सय्यद रऊफ, सरफराज मोहंमद, विकार कुरेशी, रिजवान जहागीरदार, जहीर शेख, एजाज जहागीरदार, सलिम शेख, इमरान जहागीरदार आदिंसह नागरिक उपस्थित होते.
हाजी वाजीद जहागीरदार म्हणाले की, सदर परिसरात चांगला रस्ता नसल्याने पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होत होती. याची दखल घेत पावसाळ्यापुर्वीच रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले आहे. नगरसेवक नज्जू पैलवान यांनी विकासात्मक कामांनी प्रभागाचा चेहरा मोहरा बदलला आहे. नागरिकांना मुलभुत सुविधा देण्यासाठी ते नेहमी कार्यतत्पर राहत असून, लवकरच हा प्रभाग मॉडेल ठरणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली.