जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न आवश्यक
अहमदनगर, दि. 26 - आ. संग्राम जगताप यांनी नगर शहराच्या विकासाला चालना दिली आहे. त्यामुळे त्यांचे भाषण ऐकायला मला चांगले वाटेल. मी काय लोकप्रतिनिधी नाही, त्यामुळे तुम्हाला निधी देऊ शकत नाही. तुम्ही जर संधी दिली निधी जरूर उपलब्ध करून देईन. आ. जगताप यांचे काम उत्कृष्ट आहे. जनतेत राहून काम करणारा आमदार शहराला मिळाला आहे. सर्वसामान्य जनता शासकीय योजनेपासून खूप लांब आहेत. त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करावेत. मोतिबिंदूसारखे ऑपरेशन मोफत विखे फाउंडेशन येथे होत आहेत. इतर आजारांवरही अल्पदरात सेवा दिली जाते. मात्र, शहरातील जनता याचा लाभ घेत नाही, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी केले.
प्रभाग 2च्या नगरसेविका रूपाली वारे यांच्या प्रयत्नातून निर्मलनगर परिसरात विविध विकासकामांचे उद्घाटन डॉ. विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. संग्राम जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर, गटनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमार वाकळे, अविनाश घुले, सुनील कोतकर, आरिफ शेख, सुरेश बनसोडे, बाळासाहेब भुजबळ, बाळासाहेब पवार, अभिजीत खोसे, सविता मोरे, विनित पाऊलबुद्धे, अजिंक्य बोरकर, अजय औसरकर, संभाजी गवळी, अजय हिवाळे, कुलदीप भिंगारदिवे, अश्विन गडाख, नितीन काळे, प्रवीण दांगड, प्रमोद काळभोरे, अजय ठोंबरे, विजय सानप, अमोल लगड, निर्मल थोरात आदी उपस्थित होते.
डॉ. विखे पुढे म्हणाले की, राजकीय वारसा असताना राजकारणात येणे सोपे असते. परंतु सर्वसामान्य कुटुंबातून राजकारणात येणे अवघड असते. निखील वारे यांनी सर्वसामान्य कुटुंबातून येऊन विकासकामांतून आपले कर्तृत्व सिद्ध केले, असे ते म्हणाले.
आ.जगताप म्हणाले की, जनतेत व काम करणार्या माणसाला फेसबुक व व्हॉटसअपची गरज पडत नाही. आपण जनसंपर्क व विकास हाच अजेंडा शहरात वापरत आहे. भगवानबाबा चौकातील पुलाचे काम वर्ष झाले, तरी सत्ताधार्यांनी सुरू केले नाही. आता हे काम आपण करून दाखवू. सत्ताधारी सत्तेचा उपयोग राजकीय कुरघोड्या करण्यासाठी करीत आहेत.निखील वारे म्हणाले की, प्रभागात फेज 2 अंतर्गत जलवाहिनी, बंद पाईप गटारी, 9 ठिकाणी रस्ते डांबरीकरण आदी कामे सुरू करण्यात येत आहेत. काम करणारा आमदार आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही आमच्या परिसराचा विकास करू शकलो. विकासकामामुळे लोकवस्ती वाढत आहे. पाण्याचा प्रश्न सुटला आहे. भगवान बाबा पुलाचे काम आ. जगताप यांच्या माध्यमातून मार्गी लावू, असे ते म्हणाले.