Breaking News

विरोधकांनी विरोध केला, तरी विकासकामे होणारच : सुवर्णा कोतकर

अहमदनगर, दि. 21 - नागरिक पाठीशी असतील, तर कामाला प्रोत्साहन मिळते. प्रत्येक नागरिकाच्या अडचणी सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. विविध विकासकामे करीत असताना विरोधक काम बंद करण्यात प्रयत्न करीतआहेत. त्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी विकासकामे होणारच, असे प्रतिपादन माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी केले.
प्रभाग क्र. 32मधील केडगाव, दत्त चौक येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोतकर बोलत होत्या. याप्रसंगी नगरसेवक सविता कराळे, अशोक कराळे,  सुनील शिंदे, गोरख मांढरे, संतोष शिंदे, अशोक मांढरे, कैलास शिंदे, दत्तू भुसारी, सुमन बोरगे, मीराताई काळे, शीला भोसले, मनीषा अंधारे, राठोड, सूर्यवंशी, पवार, गोरख रेडेकर आदी उपस्थित होते.
कोतकर पुढे म्हणाल्या की, काम करीत असताना कितीही विरोध झाला, तरी नागरिकांच्या सुविधांसाठी त्यांना जशास तसे उत्तर देऊ. आम्ही काम घेऊन आलो आहेत, ते पूर्ण करणारच. केडगावकरांचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व कामे होत आहेत. त्यांच्या सेवेसाठीच ही सर्वकामे होत आहेत. खर्‍या अर्थाने ही एक समान सेवा आहे. अजूनही काही ठिकाणी कामे अपूर्ण असतील, ती पूर्ण करण्याचा निश्‍चितच प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. यावेळी नगरसेविका सविता कराळे यांनी मनोगत व्यक्त केले.