संभाजीराव फाटकेंच्या कार्याबद्दल आदर आहे : नगरसेविका ठाणगे
अहमदनगर, दि. 21 - पक्षनिष्ठा जपत समाजात चांगले काम करणारे माजी आमदार संभाजीराव फाटकेबद्दल सर्व पक्षातील आणि सर्वसामान्य जनतेत आजही आदर आहे, असे नगरसेविका सौ.उषा ठाणगे यांनी फाटके यांच्या सत्कारप्रसंगी सांगितले.
येत्या 31 मे ला फाटके यांचा 71 वा वाढदिवस आहे. या कार्यक्रमाच्यानिमित्त माजी आमदार फाटके यांचा नगर-कल्याण रोडवरील श्रीकृष्णनगर (शिवनेरी हाईटस्) येथे तुळशीदास गुरव (कल्याण) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पं.दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन वसंत लोढा, माजी नगरसेवक अॅड.धनंजय जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, शहर जिल्हा उपाध्यक्ष मुन्नाशेठ चमडेवाला, भाजपचे उदय अनभुले, आरपीआयचे संतोष जाधव, अॅड.संजय शिंदे आदिं उपस्थित होते.
अत्यंत मोजक्या सामान्य कार्यकर्ते आणि जनतेच्या बळावर मी वयाच्या 31 व्या वर्षी आमदार झालो 1978-79 च्या खडतर काळानंतर 1980 ला इंदिरा गांधी यांचे नेतृत्व देशात पुन्हा उभे राहिले, त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता विधी मंडळात जावू शकला, अशी कृतज्ञता संभाजीराव फाटके यांनी व्यक्त केली. ते 1980 ते 90 च्या दशकात नेवासा-शेवगांवचे आमदार होते.
फाटके पुढे म्हणाले, म.गांधी, पंडीत नेहरु, कमला नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी आदि नेत्यांचा त्याग, निष्ठा, आणि बलिदान हा इतिहास स्वातंत्र्योत्तरकाळातही प्रेरणा देणारा आहे. स्वातंत्र्य चळवळ आणि त्यानंतर देशाच्या विकासासाठी काँग्रेसचे योगदान आहे. काँग्रेस पक्षातही अनेकांनी नि:स्वार्थीपणे काम केले, पण त्यांच्यावर टिकाटिपण्णी झाली नंतर पक्षात येणार्या गर्दीने मूळ काँग्रेसजण बाजूला पडला. सद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल योग्य दिशेने सुरु असली तरी काँग्रेस पक्ष संपणार नाही, पक्षालाही भवितव्य आहे, पण सच्चा काँग्रेसजणांची भुमिका महत्वाची आहे, असेही ते म्हणाले. स्वागत व परिचय आणि आभार प्रदर्शन आयोजक पत्रकार राजेश सटाणकर यांनी केले.