राष्ट्रीय सेवा याजेनेचे स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापनासाठी नेहमी सज्ज असतात- डॉ. मोरे
संगमनेर, दि. 21 - आपत्ती येऊ नये ही सर्वांची भूमिका असते. मात्र काही कारणाने आलीच तर तरूण आपत्ती व्यवस्थापनासाठी धावून येतात. ही जाणीव ठेवूनच महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या विदयार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी ‘’आव्हाण’’ शिबीराची सुरूवात केली आहे. या शिबीरात प्रशिक्षण घेणारे राष्ट्ीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज असतात. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे व संगमनेर महाविद्यालय आयोजित आव्हाण 2017 जिल्हास्तरीय निवड चाचणी शिबीराच्या उदघाटनप्रसंगी सी. टी. बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.सी. मोहिते यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. के. के. देशमुख, राष्ट्ीय सेवा योजना, अहमदनगर जिल्हा समन्वयक डॉ. प्रताप फलफले उपस्थित होते.
डॉ. मोहिते म्हणाले, नैसर्गिक आपत्ती ही सांगुन येणारी नसते. अशावेळी होणारी जीवीत व वित्त हाणी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले असावे. आज या निवड चाचणीतून निवड झालेले रासेयो स्वयंसेवक आपत्तीच्यावेळी नक्कीच मदतीला येतील.
प्राचार्य डॉ. के. के. देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले, नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. आपले मन शांत ठेवून स्वत:च्या बचावाबरोबरच इतरांचाही बचाव कसा करावा हे शिकविणारे हे शिबिर विद्यार्थी दशेत रासेयो स्वयंसेवकांना बरेच काही शिकविणारे आहे. या शिबिरामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या स्वयंसेवकांनी समाजाला उपयोगी होणारी मदत केली पाहिजे.