Breaking News

कर्जबाजारी शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड, दि. 12 - शेतात साठवणतळे करूनही शासनाकडून कोणतीच आर्थिक मदद मिळाली नाही. शेतावर पीक कर्ज कसे फेडायचे या कारणाने ता.लोहा येथील शेतकरी केरबा नागोबा कदम यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती शेतक-याचे नातेवाईक बालाजी कदम यानी दिली.