जैतापूर प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे - भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने
रत्नागिरी, दि. 12 - कोणताही प्रकल्प आला की त्याला विरोध करून मुर्दाबाद म्हणणे सोपे आहे. पण आपल्याला पुढची पिढी नावे ठेवेल. जैतापूर किंवा ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने विचार करावा. आंदोलन केले की प्रसिद्धी मिळते. लांजा नगरपंचायतीमध्ये तेराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करू नये, असे पत्र आमदार राजन साळवी यांनी जिल्हाधिकार्यांना दिले होते. पत्र देणे म्हणजे कायद्याचे अज्ञान आहे की सूडबुद्धी? त्यांनी कायदा समजून घेतला पाहिजे, असा सल्ला भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दिला.
भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले, लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष संपदा वाघदरे अपात्र झाल्या व त्याला नगरविकास मंत्र्यांनी स्थगिती दिली. महिला नगराध्यक्ष असताना मुद्दाम सूडाचे राजकारण केले जात आहे. वित्त आयोगाचा निधी शंभर टक्के खर्च करावा लागतो. मग तो खर्च होऊ नये म्हणून साळवी यांनी पत्र दिले होते.
रत्नागिरी पालिकेमार्फत शहराबाहेरील तिवंडेवाडीतील अपार्टमेंटला पाणी दिल्याबाबत नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी माने यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना माने यांनी नगराध्यक्षांचा खरपूस समाचार घेतला. माने म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना मी मिसगाइड कशाला करू व मी तसे केल्यास मुख्यमंत्री ऐकतील का? पाणी नगराध्यक्षांचे घरचे आहे का? नगराध्यक्ष झोपले होते का? मुख्यमंत्र्यांनी 63 कोटींची पाणी योजना एकमेव रत्नागिरीला दिली आहे. ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित झाली पाहिजे. शीळ धरणातून साळवी स्टॉपपर्यंत 42 टक्के गळती आहे. तिवंडेवाडीला पाणी दिल्यानंतर शहराला पाणीपुरवठा तेवढाच होत होता. पाणी सर्वांना मिळाले पाहिजे. पाणी योजना पूर्ण झाली की आसपासच्या गावांतील जनतेला पाणी विकूनही महसूल मिळवून त्यातून विकासकामे करणे शक्य आहे. तिवंडेवाडीला पाणीपुरवठा होताना तिप्पट दर पालिकेला मिळत होता. या कालावधीत किती महसूल मिळाला याचाही पालिकेने विचार करावा.
विरोधकांनी पाणीयोजनेचे श्रेय किंवा तांत्रिक मंजुरीचे श्रेय लाटू नये, असा इशारा बाळ माने यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी नगरोत्थानमधून हा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे हे श्रेय त्यांचेच आहे. सत्ता असताना आमदारांना 2014 पूर्वी ही योजना का करता आली नाही, असा सवालही माने यांनी केला.