Breaking News

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला गर्भधारणा

बुलडाणा, दि. 22 - फुस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. अपहरण केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी युवकाविरुद्ध दाखल पूर्वीच्या गुन्ह्यात बलात्कारासह विविध कलमानुसार गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला 22 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जालना जिल्ह्यातील राजूर गणपती येथील अमोल वैजीनाथ मोरे (22) याने मूळची लव्हाळा येथील व सध्या सैलानीत राहणार्या पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीला 7 एप्रिल रोजी फुस लावून पळवून नेले होते. मुलगी बेपत्ता असल्याने आईने रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी मुलीसह अज्ञात आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. दरम्यान, 18 मे रोजी दोघेही ढासाळवाडी तलावाजवळ असल्याचे समजताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती दीड महिन्याची गर्भवती असल्याची बाब समोर आली. त्यानुसार आरोपीविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीला 22 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे.