डॉ.संदेश वाघ यांना मनोहर धनराज प्रज्ञासूर्य पुरस्कार
बुलडाणा, दि. 22 - येथील प्रसिद्ध साहित्यिक व प्रज्ञासूर्य व्याखानमालेचे संस्थापक अध्यक्ष स्मृतिशेष मनोहर धनराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा प्रथम प्रज्ञासूर्य पुरस्कार-2017 मुंबई विद्यापीठ इतिहास विभागातील सहायोगी प्राध्यापक डॉ.संदेश वाघ यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
विज्ञान, तंत्रज्ञान व सामाजिक क्षेत्रातील नवीन प्रवाह आणि आव्हाने यावर बायोनॅनो फ्रंटियर आणि मॉरिशस विद्यापीठाद्वारे मॉरिशस येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात सदर पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा आपल्या लिखाणाद्वारे प्रचार करणार्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ.संदेश वाघ यांना मॉरिशस विद्यापीठाचे डॉ.राजेंद्र सुनटू, पेशावर येथील प्रा.मोहम्मद खान, मुंबई विद्यापीठाचे डॉ.डोंगरे, डॉ.विनोद जमधाडे, डॉ.शर्मा, प्राचार्य जयमंगल धनराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विविध देशातून आलेले शास्त्रज्ञ तथा मॉरिशस विद्यापीठाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुलडाणा शहरातील साहित्यिक चळवळीत महत्वाचेयोगदान असणारे मनोहर धनराज यांचे नावाने हा पुरस्कार देवून उदयोन्मुख साहित्यिकांना प्रेरणा मिळावी व साहित्य चळवळीकडे प्रतिभावान लेखकांनी सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून पहावे, या हेतूने वरील पुरस्कार मनोहर धनराज यांच्या स्मरणार्थ दरवर्षी मे महिन्यात देण्याचा मनोदय असल्याचे प्राचार्य जयमंगल धनराज यांनी मॉरिशस येथे सांगितले.