Breaking News

मणिपूरमध्ये झालेल्या स्फोटात चार जवान जखमी

नवी दिल्ली, दि. 09 - मणिपूरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर झालेल्या स्फोटामध्ये चार जवान जखमी झाल्याचे वृत्त मिळत आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. जखमी झालेल्या जवानांना भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून उपचारासाठी लेमाखोंग येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन जवानांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. एन.के वारेसो, अर्जुन, मिचंदा आणि गोविंद, अशी जखमी जवानांची नावे आहेत. दहशतवाद्यांनी हा स्फोट केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.