उत्तर कोरियामधून अमेरिकन नागरिकाला अटक
नवी दिल्ली, दि. 09 - देशविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली उत्तर कोरियाने एका अमेरिकन नागरिकाला अटक केल्याचे वृत्त आहे.
किम हॅक साँग असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून किम प्यांगयाँग विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात कार्यरत होते. या पूर्वी 22 एप्रिल रोजी अमेरिकन नागरिक आणि प्राध्यापक किम सँग दुक यांना उत्तर कोरियाने अटक केली होती. अमेरिका आणि उत्तर कोरिया या देशांमध्ये अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचणीवरुन वाद सुरू आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणावात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.