Breaking News

अरविंदा डी सिल्व्हा यांचा श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

कोलंबो, दि. 08 - श्रीलंकेचे माजी कर्णधार अरविंदा डी सिल्ल्हा यांनी वैयक्तिक कारणांमुळे श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.  30 जून 2017ला ते पदभार सोडणार आहेत. डी सिल्व्हा यांची या पदावर दोन वेळा नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी स्थानिक आणि  राष्ट्रीय खेळाडूंचे प्रशिक्षण कार्यक्रम कसे असावेत आणि स्थानिक क्रिकेटपटूंना कसे घडवता येईल, या बाबींवर भर दिला.
अरविंदा डी सिल्व्हा हे एक उत्तम क्रिकेटपटू आणि क्रिकेटचे जाणकार आहेत. अध्यक्षपदी कार्यरत असताना त्यांच्या ध्यानी-मनी कायमच क्रिकेटच होते. मात्र,  त्यांनादेखील त्यांचे वैयक्तिक जीवन आहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट मंडळ त्यांच्या भावनांचा आदर करते, असे मंडळाचे प्रमुख (प्रेसिडंट) थिलंगा सुमाथीपाला यांनी  सांगितले. डी सिल्व्हा पदावरून जरी दूर झाले, तरीही नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने आम्ही नेहमीच त्यांच्याकडून सहकार्य घेवू, असेही  सुमाथीपाला म्हणाले.