Breaking News

अखिलेशला मुख्यमंत्री करून फार मोठी चूक केली - मुलायम सिंग यादव

मैनपुरी, दि. 08 - अखिलेश यादवला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवून फार मोठी चूक केल्याचे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते  मुलायम सिंग यादव यांनी केले आहे. मैनपुरी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. अखिलेशला मुख्यमंत्री करणे ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक  असल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेश विधान सभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचा दारुण पराभव झाला. याच पार्श्‍वभूमीवर मुलायम सिंग यादव बोलत  होते.अखिलेशऐवजी जर मी स्वत: मुख्यमंत्री असतो तर नक्कीच पक्षाला बहुमत मिळाले असते, असेही ते म्हणाले.