Breaking News

कुलगाम जिल्ह्यातील चकमकीत लष्कर - ए - तोयबाचा दहशतवादी ठार

श्रीनगर, दि. 08 - दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात काल दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेला दहशतवादी लष्कर  - ए - तोयबाचा असल्याची माहिती मिळाली आहे.
फैयाज अहमद अश्‍वर उर्फ सेठा असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षिसही ठेवण्यात आले होते. उधमपूरमध्ये झालेल्या  दहशतवादी हल्ल्यात याचा हात असल्याचे सिद्ध झाले होते. ऑगस्ट 2015 नंतर तो बेपत्ता झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. दहशतवाद्यांनी केलेल्या  अंधाधूंद गोळीबारात तीन नागरिक ठार झाले. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दहशतवादी जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी  त्याला मृत घोषित केले. त्यानंतर हा दहशतवादी लष्कर - ए - तोयबाचा असल्याचे स्पष्ट झाले. उधमपूर दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने  याच्याविरोधात आरोपपत्रही दाखल केले होते.