Breaking News

मध्य प्रदेशात अवैध कत्तलखाने बंद करणार - शिवराज सिंग चौहान

धार, दि. 09 - मध्य प्रदेशातील अवैध कत्तलखाने बंद करणार असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले. धार जिल्ह्यातील मोहनखेडामध्ये एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जगा आणि जगू द्या, ही जैन समाजाची शिकवण आहे. कोणत्याही जिवाप्रति दया आणि अहिंसेचा संदेश जैन धर्मामधून देण्यात आला आहे. हे विचार लक्षात राज्यातील सर्व अवैध कत्तलखाने बंद करण्यात येतील, असे ते म्हणाले. नमामि देवी नर्मदे योजनेअंतर्गत राज्यातली नद्यांचे संरक्षण, पर्यावरण सुधारणा, जल संरक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेवरही भर दिला जात असल्याचे ते म्हणाले.