Breaking News

सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळाल्याचे वृत्त झाकीर नाईकने फेटाळले

नवी दिल्ली, दि. 21 - सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळाल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक यांच्या संस्थेने फेटाळून  लावले आहे. इंटरपोलने अटक करू नये, या साठी झाकीर नाईकने सौदी अरेबियाकडे नागरिकत्वाची मागणी केली होती आणि त्यानुसार त्याला तेथील नागरिकत्व  देण्यात आले, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आज सकाळपासून प्रसिद्ध होत होते. त्या पार्श्‍वभूमीवर झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेकडून पत्रक  प्रसिद्ध करण्यात आले. ‘नागरिकत्वाबाबत झालेल्या केवळ चर्चांना प्रसारमाध्यमे बातम्या म्हणून प्रसिद्ध करत आहेत. पण या सगळ्या बातम्या चुकीच्या आहेत’, असे  पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.