मतदान यंत्र हॅक करून दाखवण्याचे आव्हान
नवी दिल्ली, दि. 21 - मतदान यंत्रातील फेरफाराबाबत विरोधकांकडून आरोप करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तक्रार करणा-यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत. मतदान यंत्र हॅक करून दाखवण्यासाठी 3 जूनपासून सुरुवात होईल. यामध्ये कोणत्याही पक्षाने त्यांच्या संगणक तज्ञांसोबत येऊन ते हॅक करून दाखवावे, असे आव्हान मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी दिले.
कोणताही पक्ष केवळ चार निवडणूक क्षेत्रात वापरण्यात आलेली चार मतदान यंत्रांची निवड करू शकतात. त्यातून फेरफार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवावे. प्रशासन व तांत्रिक सुरक्षा भेदून मतदान यंत्रात फेरफार करता येऊ शकतो हे संबंधित व्यक्तीला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. जे राजकीय पक्ष 26 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंद करतील अशांनाच हे आव्हान स्विकारता येणार आहे. प्रत्येक राष्ट्रीय व राज्यस्तरीय नोंदणीकृत पक्षाकडून तीन अधिकृत व्यक्तींनाच उपस्थित रहात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले.
अनेक राजकीय पक्षांनी आयोगाकडे तक्रारी केल्या. त्यात गेल्या काही निवडणुकांतील निकाल व अपेक्षित निकाल यात फरक असल्याचे म्हटले आहे. मात्र त्याबाबत कोणतेच ठोस पुरावे देण्यात आले नाहीत. मात्र मतदान यंत्रे पूर्णत: सुरक्षित आहेत. त्यात कोणीही फेरफार किंवा ते हॅक केले जाऊ शकत नाही, असा दावा आयोगाने पुन्हा एकदा केला आहे.