Breaking News

‘चाय पे चर्चा ‘कार्यक्रमात शहर विकासावर नगरकरांचे उत्स्फुर्त विचार मंथन

अहमदनगर, दि. 29 - सकाळचा मंद वारा ...पक्षांची किलबिटात,  उगवत्या  सुर्याची पडलेली कोवळी किरण ....अन् इतिहासाची साक्ष देत असलेला  चांदबिबी महाल... अशा प्रसन्न  वातावरणात मोठया संख्येने उपस्थित असलेलया नगरकरांच्या मांदीयाळीत रंगलेले विचारमंथन...
निमित्त होते रसिक ग्रुप आयोजित शहराच्या 527 व्या स्थापना दिनानिमित्त चाय पे चर्चा या कार्यक्रमाचे, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एक रंगलेला सोहळा मतमतांतरे आणि मनोगतातून साकार झाला.
याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, महापौर सुरेखा कदम, डॉ. सुजय विखे, कोहिनुरचे प्रदीप गांधी, आमीचे अध्यक्ष उदयोजक  अशोक सोनवणे, पारसचेे  पेमराज  बोथरा, नगरसेवक सुवेद्र गांधी, मनपाचे विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे, नगरसेवक बाबासाहेब वाकळे, मनिषा काळे, निखिल वारे, श्रीनिवास बोजा आादींची प्रमुख उपस्थिती होती.अनेकांनी शहरातलया विविध प्रश्‍नांचा उहापोह यावेळी केला.
आ. संग्राम जगताप यावेळी बोलतांना म्हणाले की नगर विकासांठी शहरातील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग आसायला हवा. अनेक विकास कामे प्रगती पथावर असून तरुणांनी या प्रवाहात सामील व्हावे .शहराला विकासाच्या मोठया संधी आसून भविष्यात आापल्या शहराचा नावलौकिक उंचावेल यांची ग्वाही दिली. महापौर सुरेखा कदम म्हाणाल्या की शहराचा विकास ही काळाची गरज आसून पर्यटन, औदयोगिक, सांस्कृतिक विकास नगरकरांचे स्वप्न आाहे. आजच्या चर्चचेतुन नगरकरांची शहराविषयी आसलेली तळमळ दिसून आली. शहराच्या प्रगतीसाठी नक्कीच प्रयत्न करेल असे आश्‍वासन दिले.
डॉ.सुजय विखे म्हणाले की, शहराचा विकास होण्यासाठी दुरदृष्टी गरजेची आहे. या ऐतिहासिक शहराला खर्‍या अर्थाने माझे ही निस्चितपणे सहकार्य असेल.आशवासने  देवून किंवा शासनाच्या निधीची अपेक्षा न करता जनतेच्या सर्वागीण विकासासाठी स्वताहुन पुधकार घेणे ावश्यक आहे. शहरात अनेक प्रश्‍न आहेत. सर्वाना सोबत घेवून काम केले तर जनतेचे संपन्न्न शहराचे स्वप्न नक्कीच साकार होईल. मी देखील यासाठी कटीबध्द राहील. शहरातील चौक सुशोभिकरण व इतर विकास कामांसाठी विखे परिवाराचे योगदान निश्‍चित पणे असेल. असे सांगत त्यांनी शहरातील एका चौकाचेे सुशोभिकरणाचे जाहीर केले.