अयोध्येत एका मंदिरात महिलेवर सामुहिक बलात्कार
अयोध्या, दि. 09 - अयोध्येमध्ये जानक मंदिरात एका महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेने आणि तिच्या मुलीने मंदिरातली पाच साधूंची फैजाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी लवकरात लवकर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश मुख्य दंडाधिका-यांनी अयोध्या पोलिसांना दिले आहेत.
जानकी निवास मंदिरात राहणा-या एका महिलेवर सुदामा दास, संजय दास, रामकुमार दास, गुलशन दास आणि रघुवर हे पाचही जण वर्षभरापासून बलात्कार करत होते. एवढेच नाही तर फेब्रुवारी 2017 मध्ये या महिलेच्या मुलीवर देखील साधूंनी बलात्कार केला. यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचेही सांगण्यात आले आहे.