दिल्लीत भारतीय जनता पक्षाने राबवले स्वच्छता अभियान; तीन मंत्र्यांनी घेतला सहभाग
नवी दिल्ली, दि. 08 - दिल्लीत आज भारतीय जनता पक्षाकडून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. आज सकाळी 7 वाजता या अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानात अनेक स्वयंसेवा संस्थांनीही सहभाग नोंदवला असून यात संस्थेतील एक लाख स्वयंसेवकांचा समावेश होता. त्याच बरोबर बाबा राम रहिम, केंद्रीय मंत्री विजय गोयल, दिल्लीचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मनोज तिवारी, केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनीही या स्वच्छता अभियानात सहभागी होवून साफसफाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर साफसफाईवर आम्ही भर देवू असे दिल्लीचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी सांगितले होते.
