भाजप नेते मंगल पांडे यांची हिमाचल प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती
नवी दिल्ली, दि. 08 - भारतीय जनता पक्षाचे नेते आणिे माजी प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांची हिमाचल प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगल पांडे यांची हिमाचल प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती केली. 2017 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत चांगले व्यवस्थापन केल्यामुळे पांडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीदरम्यान पांडे यांची अवध क्षेत्राच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली होती.