पाकिस्तान नागरिकांच्या वैद्यकीय व्हिसावर भारताकडून बंदी
इस्लामाबाद, दि. 08 - भारताने पाकिस्तानच्या वैद्यकीय व्हिसावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानी नागरिकांना आता भारतात येऊन उपचार करता येणार नाहीत. सरकारने नियमावलीत बदल करून व्हिसा प्रक्रियेत कठोरता आणण्याच्या विचारात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. वैद्यकीय व्हिसावर बंदी घातल्याने हजारो पाकिस्तानी रुग्णांवर याचा परिणाम होणार आहे. या संदर्भात केंद्र सरकारने कोणतीही पूर्वसूचना देता हा निर्णय घेतला. यावर पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त गौतम बम्बावाले यांना समन्स पाठवले आहे.
पाकिस्तानी नागरिकांना व्यापार, धार्मिक, तीर्थयात्रा आदी कारणांसाठी मिळणा-या व्हिसाबाबतही आढावा घेण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. दहशतवाद्यांना सहकार्य, माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा आदी कारणांमुळे केंद्र सरकारनेही पाकिस्तानविरोधातील भूमिका कठोर केली आहे.