Breaking News

बुलडाणा जिल्ह्याचे सुपूत्र व गुंटुरचे जिल्हाधिकारी स्वप्निल पुंडकर यांचा सत्कार

बुलडाणा, दि. 26 - येथील डॉ. दिनकर पुंडकर,भावना पुंडकर यांचे पुत्र स्वप्नील पुंडकर यांची गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे जिल्हाअधिकारी म्हणून नेमणुक झाली. त्याबद्दल शहरातील एकतानगरमध्ये स्वप्नीलचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रंथालय संचालक गणोश तायडे हे होते. कार्यक्रमाच्य सुरुवातीला भगवान गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून बोध्दाचार्य महाबोध्दीविहार समीतीचे अध्यक्ष दाभाडे यांनी बुध्द वंदना घेवुन कार्यक्रमाची सुरूवात केली. उपस्थीतांनी स्वप्नील जिल्हाधिकारी झाल्या बद्दल त्याचा व त्याच्या माता-पित्याचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना स्वप्निल म्हणाला की, माझ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व बुध्द धम्माचे संस्कार माझे आजोबा माजी खासदार लक्ष्मण भटकर (चिखली) व आई वडिलांनी घातल्यामुळे हे शिखर गाठले आहे. यामुळे बाबासाहेबांच्या विचाराला मीकदापी तडा जाऊ देणार नसल्याचे सांगीतले. यावेळी साहित्यीक नारायण जाधव, बाबासाहेब जाधव, राजू साबळे, पि. एम. चव्हाण, सुभेदार तेलंग,पदमावती तायडे, नगरसेविका खरात, भास्कर पुंडकर, डी. एस. बोर्डे, खरात, देशपांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जे. पी. वाकोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तेलंग यांनी केले.