Breaking News

वादळीवार्‍यासह पावसाचे थैमान - अनेक ठिकाणी नुकसान

। सोनेवाडी परीसरात पावसासह गारांचा पाऊस  । पडझड व घरावरील पत्रे उडाली । टाकळी ढोकेश्‍वरमध्ये वीज पडून एक ठार

अहमदनगर, दि. 26 - जिल्हयात अनेक ठिकाणी  गुरुवारी वादळाने आणि काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गुरवारी अनेक ठिकाणी पत्रे उडाले तर टाकळी ढोकेश्‍वरमध्ये वीज पडून एक ठार आहे. तर दोघेजन जखमी आहेत. हिवरेझरे येथे झाड कोसळल्याने श्रीगोंदा मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.
शहरानजीक अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. गुरवारी दुपारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने वृक्ष वार्‍याने उखडुन पडले होते. तर काही ठिकाणी वारा सुसाट असल्याने तारांही तुटल्याची माहिती मिळाली आहे. सोनेवाडी भागात पावसाने हजेरी लावली यामध्ये गारांचा जोरदार पाऊस पडल्याचे समजले आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. घरावरील पत्रे उडुन गेले आहे. यामध्ये रामदास तवले, अशोक दळवी, भाऊसाहेब गव्हाणे, रामदास तवले आदिचे  नुकसान  झाले  आहे.