यंदा जिल्ह्यात 8 लाख 52 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
बुलडाणा, दि. 26 - बुलडाणा जिल्ह्यात वनविभागासह विविध विभागांमार्फत यंदा 8 लाख 52 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असून, या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी पुलकुंडवार म्हणाले की, 2017 मध्ये 1 ते 7 जुलै या कालावधीत राज्यात 4 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले आहे. 2018 मध्ये 13 कोटी आणि 2019 मध्ये 33 कोटींचे टार्गेट आहे. या तीन वर्षांच्या काळात एकूण 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वनविभागाला 2 लाख 28 हजारांची वृक्ष लागवड करावयाची आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभागाला 1 लाख 28 हजार, जिल्ह्यातील 869 ग्रामपंचायतींना 364 प्रमाणे 3 लाख 15 हजार वृक्षारोपण करावे लागणार आहे. 8 लाख 52 हजार वृक्षांची रोपे पुरविण्याचे काम वनविभाग व सामाजिक वनीकरण करणार असल्याचे ते म्हणाले. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यात वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या 14 समन्वयकांची नेमणूक करण्यात आल्याचे सांगून बी.टी. भगत म्हणाले, 5 ते 15 जून या काळात वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्यात येतील. 23 ते 27 जूनदरम्यान रोपांची वाहतून केली जाईल. 29 ते 30 जूनपर्यंत ही रोपे खड्डयांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येईल आणि 1 ते 7 जुलै या कालावधीत वृक्ष लागवड केली जाणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, जिल्हा उपवनसंरक्षक बी.टी. भगत यांनीही वृक्षलागवडीचा कार्यक्रम स्पष्ट केला.