Breaking News

दहशतवादी कारवायांना आळा न घातल्यास हल्ले करु - मेजर जनरल मोहम्मद बकेरी

तेहरान, दि. 09 - पाकिस्तानमधील दहशतकडून सीमेपलीकडे असलेल्या इराणवर वारंवार हल्ले हल्ले करण्यात येत आहे. या दहशतवादी कारवायांना पाकिस्तानी लष्कराने योग्य वेळी आळा न घातल्यास इराणच्या लष्करी दलाकडून दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करण्यात येतील, असा इशारा इराणच्या लष्कर प्रमुखांनी आज दिला आहे.
गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 10 इराणचे जवान शहीद झाले होते. जैश अल अदल या दहशतवादी संघटनेकडून लांब पल्ल्यांच्या बंदुकींच्या वापराने पाकिस्तानात राहून इराणच्या लष्करावर हल्ला करत आहेत. अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे सीमेजवळी भागातात राजकीय अस्थिरता असल्याचेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानकडून करण्यात येणा-या दहशतवादी कारवाया जास्त काळ सहन करणार नाही. तसेच पाकिस्तानी अधिकारी सिमारेषेवर नियंत्रण करेल आणि दहशतवाद्यांना पकडून त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करेल, असेही इराणचे लष्कर प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बकेरी यांनी सांगितले.