Breaking News

भिवंडीत गाडीत सापडली साठ लाखांची कॅश

भिवंडी, दि. 24 - आज भिवंडी महानगरपालिकेसाठी मतदान होतं. या पार्श्‍वर्भूमीवर परिसरात एका गाडीत तब्बल साठ लाख रुपये पोलिसांना सापडले. ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. कल्याण रोडवरील साईबाबा नाका इथं ही कारवाई करण्यात आली. 
नाकाबंदी दरम्यान आचारसंहिता पथकाचे डॉ. सुनील भालेराव यांनी ही कारवाई केलीय. भिवंडी पालिकेसाठी मतदान होणार आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला ही रोकड सापडली. महाराष्ट्र ग्रामीण बँकेची ही रोकड असल्याचा दावा करण्यात येत आहेें. मात्र, कारच्या नंबर प्लेटवर शिवसेनेचा झेडा असल्यानं याचं गूढ वाढलं.