Breaking News

जिओ 4 जी चे नवीन 13 धमाकेदार प्लान

मुंबई, दि. 24 - जिओ इंटरनेट वापरकर्त्यांना निश्‍चित अपेक्षेपेक्षा जास्त देत आहे. जिओने आता 4 जी वापरणार्‍यांसाठी एक नाही दोन नाही तब्बल 13 नवीन प्लॅन आणले आहेत. जिओच्या वेबसाईटवर आतापर्यंत 3 प्लान होते, त्यात नवीन प्लान जोडण्यात आले आहेत.  जिओचे नवीन प्लॅन अगदी 19 रुपयांपासून 4 हजार 999 रुपयांपर्यंत आहेत. यात जियो जुन्या किमतींमध्येच अधिकाधिक डाटा देणार आहे.
जीओ ची धन धना धन ऑफर यापुढे केवळ जियो प्राइम यूझर्ससाठी उपलब्ध राहणार आहे. नॉन प्राइम यूझर्ज केवळ 19 रुपये ते 149 रुपयांचे प्लॅन घेऊ शकणार आहेत. इतर प्लॅन घेण्यासाठी त्यांना प्राईम मेंबरशिप घ्यावी लागणार आहे. धन धना धन ऑफर जाहीर करण्यापूर्वी तसे नव्हते. सर्वच प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये कॉलिंग, रोमिंग आणि मॅसेजिंग सेवा मोफत दिली जाणार आहे. जियोने प्रिपेड प्लॅन जाहीर करतानाच नव्या 3 पोस्टपेड प्लॅन्सची घोषणा केली आहे. यात 309, 509 आणि 999 असे प्लॅन आहेत. हे प्लॅन 303 आणि 499 च्या प्लॅन्सची जागा घेणार आहेत.