Breaking News

‘आयएसआय’ च्या गुप्तहेराला फैजाबाद येथे अटक

नवी दिल्ली, दि. 04 - पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’च्या एका गुप्तहेराला आज फैजाबादमधून अटक करण्यात आली. आफताब अली असे त्याचे नाव असून तो फैजाबादमधील ख्वासपुरा हिवाशी आहे. या प्रकरणी त्याच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात आणखी काही जणांना अटक होवू शकते अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. आफताब याने ‘आयएसआय’कडून प्रशिक्षण घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात आमच्याकडे पुरावे असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाकडून सांगण्यात आले.