आत्महत्येचा विचार करण्यापेक्षा सीमेवर लढण्याचा निर्धार करा -अक्षय कुमार
नवी दिल्ली, दि. 04 - तरुणांनी आत्महत्येचा विचार करण्यापेक्षा सीमेवर जावून लढण्याचा निर्धार करावा, असे प्रतिपादन अभिनेता अक्षय कुमार याने केले. आज दिल्लीमध्ये 64 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. अभिनेता अक्षय कुमार याला ‘रुस्तम’ चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा आनंद सर्वांशी शेअर करता यावा म्हणून त्याने ‘हॅशटॅगडायरेक्टदिलसे’ याअंतर्गत फेसबुकवर एक ध्वनीचित्रफीत प्रसिद्ध केली.
त्यात तो म्हणतो की, आत्ताच मी आयआयटीच्या विद्यार्थ्याने अभ्यासाच्या दबावामुळे आत्महत्या केली असल्याची बातमी वाचली. हे वाचून मला खूप दु:ख झाले. जर आत्महत्याच करायची असेल तर तरुणांनी सीमेवर जावे. जशी प्रत्येक कुलुपाची किल्ली असते. त्याचप्रमाणे प्रत्येक समस्येवर उपायही आहे. आत्महत्या करणे हा कोणत्याही समस्येवरचा उपाय असू शकत नाही, असेही त्याने म्हटले आहे.