नांदुरीदुमाला येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
संगमनेर, दि. 29 - गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील नांदुरीदुमाला येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या काल रविवारी पहाटेच्या सुमारास अलगत पिंजर्यात अडकला. अंदाजे 3 वर्षे वयाचा नर जातीचा हा बिबट्या आहे.
तालुक्यातील नांदूरी दुमाला शिवारात बिबट्याने धुमाकूळ घालून ग्रामस्थांना हैराण करुन सोडले होते. पशु धनाबरोबरच त्याचे माणसांवरही हल्ले वाढले होते. पाच दिवसांपूर्वी शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या सौ. शारदा निवृत्ती कवडे या महिलेवर हल्ला करुन तिला जबर जखमी केले होते. ही घटना बुधवार दिनांक 25 मे रोजी घडली होती. त्या दिवसांपासून वनविभागाने नांदुरी -दुमाला शिवारात पिंजरा लावला होता. पाच दिवसांपासून बिबट्या पिंजर्यात येत नव्हता. अखेर काल रविवारी पहाटे तो अलगत पिंजर्यात अडकला. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनक्षेत्रपाल निलेश आखाडे, वनपाल शेखर पाटोळे, वनरक्षक सुहास उपासणी, वनमजूर ओंकार बोरुडे, चालक रवी पडवळे यांनी घटनास्थळी जावून बिबट्याला पाहुणचारासाठी चंदनापुरीच्या रोपवाटीकेत नेले. बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.