बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी वीरभद्र सिंग, पत्नीला समन्स
नवी दिल्ली, दि. 09 - बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने आज हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग आणि त्यांची पत्नी प्रतिभा सिंग यांना समन्स बजावले. 22 मे रोजी या दोघांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विरेंद्र कुमार गोयल यांनी दिले. या प्रकरणी सिंग आणि त्यांच्या पत्नीसह अन्य 9 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
केंद्रीय अन्वेषण विभागाने आरोपपत्र दाखल करताना नियमाचे पालन केले नसल्यामुळे प्रतिभा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला नोटीसही बजावली होती.
केंद्रीय अन्वेषण विभागाने आरोपपत्र दाखल करताना नियमाचे पालन केले नसल्यामुळे प्रतिभा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला नोटीसही बजावली होती.