Breaking News

सुहेल महमूद भारतातील पाकचे नवे उच्चायुक्त

नवी दिल्ली, दि. 09 - भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तपदी सुहेल महमूद यांची नियुक्ती करणी. सध्याचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्या जागी सुहेल महमूद यांची नियुक्ती करण्यात आली. अब्दुल बासित यांचा कार्यकाळ याच महिन्यात संपणार आहे. महमूद 1985 मध्ये परराष्ट्र सेवेत रे होते. 1991 ते 1994 या कालावधीत महमूद यांनी तुर्कस्थानच्या उच्चायुक्त पदी काम पाहिले होते.
2014 मध्ये भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तपदी बासित यांची नियुक्ती करण्यात आली होती. बासित तीन वर्ष भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तपदी कार्यरत होते. बासित हे पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख राहील शरीफ यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे.