Breaking News

आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या हस्ते उपोषणाची सांगता

बुलडाणा, दि. 21 - जिल्हयातील शेतकर्‍यांच्या तुरीची वेगाने खरेदी व्हावी, सध्या खरेदीचा असलेला वेग वाढविण्यात यावा, शासनाने खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे तातडीने देण्यात यावे, या मागण्यासाठी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालया समोर कॉगे्रस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे व चौदा पदाधिकार्‍यांनी दिनांक 18 मे पासून सुरू केलेल्या आमरण उपोषणास यश मिळून शासनाने आतापर्यंत खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे देण्यासाठी निधी संपुर्ण राज्याला उपलब्ध करून दिला आहे. तर 22 एप्रिल नंतर खरेदी करावयाच्या तुरीसाठी बारदाण्याची व्यवस्था, तुर उघडयावर राहणार नाही याबाबतची दक्षता, व मोजमाप काटे आवश्यक त्या प्रमाणात, आवश्यक त्या केंद्रावर वाढविण्यात आले असल्यामुळे व 31 मे 2017 पर्यंत नाफेड मार्फत खरेदी करावयाच्या तुरीची नोंदणी सुरू करून खरेदीही प्रत्यक्षात सुूरू करण्यात आल्याने या मागण्यासाठी आमदार राहुल बोंद्र यांनी सुरू केलेले उपोषण तिसर्‍या दिवसी आत्महत्या केलेल्या शेतकरी विधवांच्या हस्ते जल प्राशन करून उपोषण सोडले.
या उपोषणात कॉगे्रस सोबतच विविध पक्ष संघटना व शेतकरी वर्गातून प्रचंड प्रतिसाद लाभल्याने पुर्ण बुलडाणा जिल्हा ढवळुन निघाला होता. आज विधान मंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झाल्यावर विशेष अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली तुर खरेदीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या अनुशंगाने विधानसभेत स्तगन प्रस्ताव दाखल केला. सदर प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष यांनी नाकारला तथापी या बाबत सभागृहास माहिती देण्याबाबत सांगितले. त्याअनुशंगाने हर्षवर्धन सपकाळ यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या संदर्भात सभागृहास अवगत केले. त्यावर विधानसभा अध्यक्ष प्रस्तुत प्रकरणी त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. अध्यक्षांच्या निर्देशाच्या अनुशंगाने मुख्यमंत्री नामदार देवेेंद्र फडणवीस यांनी राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री भाउसाहेब फुंडकर यांना त्वरीत कार्यवाहीच्या अनुशंगाने आवश्यक त्या सुचना दिल्या. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी शासन नेमक्या कोणत्या ठोस उपाय योजना करणार याबाबत माहिती सभागृहाला देण्याची मागणी केली. त्या अनुशंगाने कृषी मंत्री तथा पालकमंत्री ना. भाउसासहेब फुंडकर यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या मागणी प्रमाणे त्वरीत कार्यवाही सुरू केल्या जाईव व त्यांचे समाधान केले जाईल असे सांगितले. सोबतच विधान भवनातून संबंधती जिल्हा प्रशासनाला आवश्यक त्या सुचना दिल्या.
विधान भवनातील या घडामोडीनंतर राज्याचे मुख्य सचिव सुमित मलीक यांनी आमदार राहुल बोंदे्र यांचेशी दुरध्वनीवरून चर्चा केली. तर जिल्हाधिकरी डॉ. पुलकुंडवार यांनी केलेल्या कार्यवाहीबध्दल सविस्तर माहिती व तुर खरेदी बध्दलची अदयावत माहीती देणारे पत्र आमदार राहुल बोंद्रे यांना देवून उपोषण सोडण्याचे विनंती केली. त्यावर बुलडाणा जिल्यामध्ये सोयाबीन व तुर पिकाचे दयनिय स्थितीमुळे आत्महत्या केलेले शेतकरी याच्या विधवा व कुटूंबियांच्या हस्ते जलपान करून उपोषण सोडले.यावेळी सिताबाई बाबुराव शेजोळ,  लक्ष्मीबाई अशोक सोनवणे, शिलाबाई विक्रम पवार, कांताबाई महादेव इंगळे, यांच्याहस्ते जलपान देण्यात आले. यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळयाजवळ जावून आमदार राहुल बोंद्रे यांच्या हस्ते हार आर्पण अभिवादन करण्यात आले. राष्ट्रगित म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.
बुलडाणा जिल्हयाबरोबरच राज्यातील ज्वलंत तुरीच्या प्रश्‍नावर छेडलेल्या या आंदोलनात आमदार राहुल बोंद्रे यांच्या उपोषणामुळे राज्यभरातील शेतकर्‍यांचे या विषयीचे प्रश्‍न मार्गी लागले आहे. 31 मे 2017 पर्यंत नाफेड मार्फत खरेदी करावयाच्या तुरीची नोंदणी सुरू करून खरेदी देखील सुरू झाली आहे. तर आजवर झालेल्या खरेदी बाबत तुरीचे चुकारे शेतकर्‍यांना देण्याबाबत मा. प्रधान सचिव, कृषी व पणन विभाग व तसेच मा. व्यवस्थापकीय संचालक, मार्केटींग फेडरेशन यांनी चुकारे देण्यासाठी शासन हमीस मान्यता घेवून सदर निधी आज बुलडाणा जिल्याला उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर 22 एप्रील पर्यंतची सर्व तुर खरेदी करण्यात आली असून पुढील तुर खरेदीसाठी खरेदी यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. शासकीय यंत्रणेनुसार बुलडाणा जिल्हयात 31 मे 2017 पर्यंत 237126 क्विंटल तुर खरेदी अपेक्षीत असुून त्याची तयारी पुर्ण करण्यात आलेली आहे. आमदार राहुल बोंद्रे यांच्या सोबत आमरण उपोषणास बसणार्‍यांचे नावे सतिश मेहेंद्रे, शैलेश सावजी, राजु काटेकर, अ‍ॅड. शरद राखोंडे, अर्जुन घोलप, नितीन ढंगे, तुळशिराम मानकर, जितु मुळावकर, सुरेश वानखेडे, गौतम मोरे, विठ्ठल इंगळे, श्रीकृष्ण इंगळे, प्रमोद पाटील, मोहन बाभ्ाुळकर यांचा समावेश होता.
20 मे 2017 रोजी उपोषणास निलकमल गणेश मंडळ चिखली, अंधारा महादेव जिर्णोधार समिती चिखली, निलकमल शेतकरी बचत गट चिखली व निलकमल प्रतिष्ठाण यांचे सर्व कार्यकर्त्यांनी उपोषणास पाठींबा देवून उपोषणास सहभाग घेतला.