Breaking News

सराफा प्लॉट वस्तीत पाण्याचा पुरवठा करा

बुलडाणा, दि. 21 - चिखली नगर पालिकेच्या हद्दीतील जाफ्राबाद रोड सराफ प्लॉट परिसरातील वस्तीत गेल्यापंधरा वर्षापासून पाईप लाईन टाकलेली नसल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करणार्‍या महिलांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना 20 मे शनिवारी निवेदन देवून या भागात तत्काळ पाणी पुरवठा होईल अशी पाईप लाईन टाकून पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवावा अशी मागणी निवेदना द्वारे केली आहे.
या भागातील विकासाकडे नगर पालिका जाणुन बुजून दूर्लक्ष करीत असल्याने या भागातील नागरिक संपत्प झाले असून येत्या आठ दिवसात या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवावा अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मंदा वानेरे, आम्रपाली इंगळे, पुनम इंगळे, यमुना मिसाळ, साधना मेढे, गणेश वानखेडे, राजेश परिहार, वंदना वानखेडे, अनिता वाघ, आशा भुतेकर, रत्ना जोहरे, बेबी वाघ, सविता अवसरमोल यांच्यासह इतर महिलांनी निवेदनाद्वारे दिला आहे.