भारतात क्रिकेट मालिका खेळण्यास पाकचा संघ तयार : शहरयार खान
कराची, दि. 12 - भारतात पाकिस्तानच्या संघाला धोका असला तरीही, पाकिस्तानचा संघ भारतात क्रिकेट मालिका खेळण्यास तयार आहे, असे आज पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी स्पष्ट केले. एका मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.
भारतात पाकिस्तानच्या संघाने दाखल होणे, हे पाकच्या संघासाठी सुरक्षेच्या दृष्टीने काहीसे धोकादायक आहे. तरीदेखील आम्ही भारतात क्रिकेट मालिका खेळण्यास तयार आहोत. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्यांच्याच देशात (भारतात) भारतीय संघाला पाकिस्तानशी क्रिकेट खेळू देण्यास तयारी दर्शवत नाही, असा आरोप खान यांनी केला.
भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणा-या सामन्यांमधून क्रिकेटला सर्वाधिक उत्पन्न मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषददेखील हे मान्य करत आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या या आडमुठ्या धोरणामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे, असेही शहरयार खान यांनी नमूद केले.