Breaking News

माद्रिद ओपन : जोकोव्हिचची उपांत्यपूर्व फेरीत धडक

माद्रीद, दि. 12 - माद्रीद खुल्या टेनिस स्पर्धेत आज द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. जोकोव्हिचने स्पेनच्या फेलिसीआनो लोपेझयाला 6-4, 7-5 असे पराभूत केले. जोकोव्हिचने लौकिकाला साजेसा खेळ केला. पण लोपेझनेही त्याला सहज विजय मिळू दिला नाही. जोकोव्हिचला विजयासाठी झुंजावे लागले. पण अखेरजोकोव्हिच्या अनुभवापुढे लोपेझचा लढा कमी पडला. उपांत्यपूर्व फेरीत जोकोव्हिचचा सामना केई निशीकोरीशी होणार आहे.